मंथन
कोणी कापला अंगठा
कोणी बोलला वनवासी
जरा आठवा इतिहास
कोणी खाल्ली उष्टी बोरं
कोण इथं खरा चोर
जरा वाचा तो इतिहास
कोणी म्हणे रानटी
कोणी चोरली लंगोटी
जरा आठवा इतिहास
कोण इथले मालक
कोण इथला चालक
जरा वाचा तो इतिहास
कोणी म्हणे लाजरा
कोणाचा खरा दरारा
जरा आठवा इतिहास
कोण खैबरखिंडीतून आले
कोण नैतिकता सोडून चाले
जरा वाचा तो इतिहास
कोणी केला नखरा
कोण इथे उपरा
जरा आठवा इतिहास
कोणाची ही जमीन
कोणाला जामीन
जरा वाचा तो इतिहास
कोण इथला रहिवासी
कोण कुठला विदेशी
जरा आठवा इतिहास
कोणाची ही शेकोटी
आता आमच्या गोष्टी
जरा वाचा तो इतिहास
-rajuthokal.com
0 comments :
Post a Comment