धडे बलिदानाचे...
ना मज भीती मृत्यूची
ना मज चिंता शत्रूची
मी स्वच्छंदी शब्दांचा
राजहंस निसर्गातला
आदिवासी संस्कृतीचा
दीपस्तंभ साहित्याचा.....
करा रे षंडांनो
बाता घुसखोरीच्या
आणा रे मेंढरांनो
आव आदिवासीपणाचा
एकलव्याचा तीर शब्दांतून
आता निशाण साधणार आहे
आजवर लाटलेल्या
आजवर चोरलेल्या
आमच्या ताटातील सवलतींचा
हिशोब मागणार आहे....
वारसा लढाऊ असता
डोंगर द-यात घुसले लांडगे
जाणीव अन्यायाची करण्या
शब्दांशी इतिहासाचे जोडू नाते
क्रान्तीची मशाल आदिवासी
गौरवाची निधडी छाती
आमचेच नोकरदार थंड
तेव्हा शिरजोर करती बंड
चला करू उलगुला
उद्याच्या क्रान्तिचे
जागवू धडे
आदिवासी बलिदानाने....
भलर
निसर्ग संस्कृतीचे आदिवासी पर्व
0 comments :
Post a Comment