रंग हे सजलेले
ढीगभर दुःख
मनात साठलेले
सावकार व्याजासाठी
दारात थांबलेले
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
गुडघाभर चिखल
शिवार नटलेले
धुवांधार पाऊस
रान हे भिजलेले
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
पिकलेला माल
वावरात सडलेला
बाजारभावावाचून
शेतकरी रडलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
कर्जमाफीचा फास
घोर न मिटलेला
तोच तो पानकळा
घाम न आटलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
सण आज आला
हंबरडा ऐकलेला
नाळ ती मातीशी
संस्कृतीनं नटलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
कृषीसंस्कारांचं वाण
माणूस घडलेला
राबून दिनरात
माणुसकी जपलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
वाढत्या महागाईत
शेतकरी वैतागलेला
पीक उभं शेतात
भाव सदा पडलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
गोड पुरणपोळी
सण आज आनंदलेला
जीवलगा प्राणीमित्रांसाठी
बैलपोळा रंगलेला
फक्त सर्जाराजासाठी
रंग हे सजलेले
- The Son of Sahyadri
0 comments :
Post a Comment