#झलकारीबाई_कोरी
भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पान.
या देशात निःपक्षपाती लेखन केले गेलेच नाही. कलम कसायांनी व्यक्ती बघूनच आपापल्या परीने बोरु चालवल्या.
पण या देशात दुसरी एक पद्धत होती की ज्या पद्धतीने प्रचार प्रसार केला जात होता. ती पद्धती म्हणजे लोकगीत.
बुंदेलखंडाच्या लोकगीतात असच एक नाव अजरामर आहे ते म्हणजे झलकारीबाई कोरी.
कोण होती ही झलकारीबाई?
सन १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांच्या दुर्गा दलाची प्रमुख.
झलकारीबाई चा जन्म हा २२ नोव्हेंबर १८३० ला भोजला या खेड्यात एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कोरी जातीत झाला. तिच्या वडिलांचे नाव मूलचंद व आईचे नाव जमूनाबाई होते.
लहानपणी रानात शेळ्या घेऊन गेलेली झलकारी ही एका बिबळ्या ला कुऱ्हाडीने जेरबंद करते.
तिचा विवाह हा झाँशीतील पूरण कोरी याच्याशी झाल्यावर ती झाँशीत राहते.
झलकारीबाई आणि लक्ष्मीबाई ह्या हूबेहूब शरीरयष्टी व नाकी डोळी दिसायला लागतात. १८५७ ला जेव्हा इंग्रज कंपनी सरकार झाँशीचे दत्तक वारसा नामंजूर करुन ते संस्थान हडप करु पाहते, तेव्हा लक्ष्मीबाई चे सैन्य व इंग्रज यांच्यात लढाई सुरू झाली. या लढाईत झाँशीचा सेनापती दुल्हेराव हा इंग्रजांना फितूर होऊन किल्याचे दरवाजे उघडतो.
त्यावेळेस झलकारीबाई कोरी ही राणी लक्ष्मीबाई यांना चोर वाटेने पळून जाण्यास भाग पाडते व स्वतः राणीचा वेषांतर करुन स्वतः इंग्रजां सोबत १२ तास युद्ध करते.
राणी लक्ष्मीबाई ह्या सुखरूप झाँशीच्या बाहेर गेलेल्या असतात.
जेव्हा झलकारीबाई ला इंग्रज अधिकारी पकडून कैद करतात. तेव्हा कँप्टन रोज हा झलकारीबाई ला ओळखतो आणि अशी साक्ष देतो की, ही स्त्री लक्ष्मीबाई नसून झलकारीबाई आहे.
आणि नंतर अशी पुष्टी जोडतो की, भारताच्या स्वातंत्र्याच्या युद्धात जर हिच्या सारख्या अजूनही दोन चार महिला झाल्यावर आम्हाला आमच्या मायदेशी लवकरात लवकर परतावे लागेल.
ही आहे झलकारीबाई कोरी.
पण हाय रे इतिहास संशोधक त्यांना राजमहालातील इतिहास शोधावा वाटतो. झोपडीत तर ते ढुंकूनही पाहत नाहीत.
पण मैथिलीशरण गुप्तने त्याच्या हिंदी पंक्तीत झलकारीबाई ला नमन केले आहे.
जा कर रण में ललकारी थी,
वह तो झाँशी की झलकारी थी।
गोरों से लडना सिखा गई,
है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही नारी थी।
भारत सरकारने झलकारीबाई कोरीच्या नावे एक टपाल तिकीट काढून टाकले आहे.
#आझादी_के_दिवाने
#जागर_क्रांतीचा
#जागर_इतिहासाचा
0 comments :
Post a Comment