पावसातलं गाणं
पाऊस तर नेहमीच
झोडत आलाय मजला
डोळ्यांतून अश्रू गाळून
रडून थकलीय अबला
पण जेव्हा जेव्हा
तो झोडतो पुन्हा पुन्हा
मनात दाटतो विचार
काय केला रे मी गुन्हा
तो आधारही देतो
नवा अंकुर फुलवून
तो तहानही भागवतो
उंच कड्यावरून कोसळून
थेंब ओले झेलून
तन चिंब भिजलंय
उडालेलं छप्पर पाहून
मन कठोर बनलंय
सरकुन पडलो अनेकदा
बिकट वाटा चालताना
रडलो नाही कधीच
संसाराचा भार पेलताना
दुःख सारं लपवतो
फुललेली फुलं पाहताना
हिरवळ रानी तुडवतो
गीत पाखरांचे गाताना
कुरूप बनलेलं दारिद्र्य
कधी कुणाला दाखवत नाही
फाटकी चोळी लपवताना
पदर कसा पुरत नाही
श्वास वेडा घेताना
जीव कासावीस होई
काळ्या आईकडे पाहताना
जीव तीळतीळ तुटत जाई
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment