घबाडाचे धनी - राजू ठोकळ
दोन लाथा ह्यांनी मारल्या
दोन लाथा त्यांनी मारल्या
जातीवाद इथे पेरून
माड्या बघा कोणी बांधल्या?
यांनी दगड फेकले
त्यांनीही दगड फेकले
डोकी आमचीच फुटली
हित बघा कोणाचे जपले?
झेंडा यांनीही मिरवला
झेंडा त्यांनीही फडकवला
हातात कोलीत देऊन
डंका बघा कोणी पिटवला?
घरं यांनीही जाळली
घरं त्यांनीही जाळली
गरीबाच्या पोटाची
भूक बघा कशी छळली?
विष यांच्याही डोक्यात पेरलं
विष त्यांच्याही डोक्यात पेरलं
जिंदगी बरबाद करून
सुपीक पीक बघा कोणी घेतलं?
दारिद्र्य यांच्याही घरात
दारिद्र्य त्यांच्याही घरात
काडीमात्र काम न करता
लक्ष्मी नांदते बघा कोणाच्या दारात ?
बळी हे पण ठरले
बळी ते पण ठरले
धर्माची ही लक्तरं चिटकवून
घबाडाचे धनी बघा कोण ठरले?
- Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment