धारेराव आसवला
एक धारा आसावला व्हता.तो ह्या जंगलात गाया चारायचा लाकडा तोडायचा.पण सरकारला रानचाराई काय भरायचा नही.तव्हा सरकारना त्याला नोटीस दिली.तू जर रानचाराई भरली नय त तुला पकडून नेऊ .
पण तो पका रगाट गडी.पक्या इद्या वश करेल.तो काय सरकारचे ऐकना.तवा कोकणातून तीन पोलीस त्याला पकडाया घाट येण्गुन वर आलं.व यांना गबाळ्या सारखी मळकी कपडी घालेल.कुऱ्ह्याड हातात.पार गबाळ्या सारखा व्हायेल.
धारा त्या घाटाच्या तोंडावं बसला व्हता.घाट येण्गुन पोलिस आलं बाँ वर यांन ह्यारला त्येंच्या हातात बंदुका हायात म्हंजी हे अपलेलीच पकडाया आलत.हा नेटकूच (हटकून)तेंच्या जवळ ग्यालानं तेनली म्हणतो, “कुकलं पाव्हणं?” ते म्हणं “आम्ही पोलिसत,” हा म्हणतो, “मग इक कुकं रस्ता चुकलेत का काय?” तव्हा पोलीस म्हणलं,आम्ही त्या धारारावला पकडाया चालोय.”
त हा म्हंतो.तो कह्याचा तुमली सापडतोय.यावडा माँठा जंगल आन त्याचा लय लपान.तवा “मंग आसं बोलत बोलत निंगाला जंगलात.हा तेंच्या बरुबरच चाला गप्पा मारीत हा मधीच म्हंतो, “ह्या काये ओ तुमच्याक?” त ते म्हणं “ह्या बंदुका हायेत बंदुका” त धारया म्हंतो “म्हंजे काय ओ?” त ते लागलं सांगाया, “आरे ह्याच्यात गोळ्या हायेत आन तो धारया दिसला का तेच्या डोक्यात गोळ्या घालून मारून न्याचाय.”
“अरे बाप रे!एवढा हत्यार हाये काय.त मंग ते तीन पोलीस आन हा पार भयाण जंगलात आलं. हा तेनली म्हंतो, “सायेब,तुमाली जड झाला आसल त दया महयाकं, थाँडा येळ घेतु मी.”तव्हा ते म्हणलं, ”नको रे तू काही उदयोग करशील.”
तसच चालत रयलं.परत हा म्हंतो “सायेब,तुमाली जड झाल्याचं सांगा बरका.मी घेऊ लागलं.”मंग तेनी बंदुका दिली येच्याकं.अन मंग काय यानं तिनी पोलीस टाकलं मारून.
हि बातमी सरकारला कळली.पण धारयाला काय पकडू शकलं नहीं.
शेवटी तो पोलिसांना शरण गँला.म्हणं,तुम्ही काय मला पकडू शकणार नही.तवा मला पकडून न्या पण मही येक आटय. “मी जिथवर दगड फेकीन तेवडी जमीन मह्या नावाची करून दया.”अन मंग त्यान दंडातला ताईत काडून ठिवला अन सरकारच्या ताब्यात गँला.
तेची एक बहिण व्हती जानुबाई तिला जानेवाडीचा शँत दिला.तव्हा तिथ जाणूबायचा मंदिरय.
संदर्भ:- अहमदनगरजिल्ह्यतील अकोले तालुक्याच्या पश्चिमेला घाटमाथ्यावर कुमशेत गाव आहे.त्या गावाजवळ धारारावाचे मंदिर आहे.
0 comments :
Post a Comment