The Bombay Forest Rules, 1942 नुसार मुंबई प्रांतातील आदिवासी जमातींची यादी दिलेली आहे. त्या यादीत Oraon, Dhangad यांची नोंद नाही. तसेच धनगर ही नोंद नाही. सदर यादीचा विचार करता जसे Oraon, Dhangad हे मुंबई प्रांतात आदिवासी म्हणून ब्रिटिशांनी नोंदविलेले नाहीत. तसेच धनगर हे देखील आदिवासी म्हणून ब्रिटिशांनी गृहीत धरलेले नाहीत. याचा कोणी काय अर्थ लावायचा हे ज्याचे त्याचे विचार स्वातंत्र्य आहे.
परंतु माझ्या मते Oraon, Dhangad यांची लोकसंख्या 1931 च्या जनगणनेनुसार अत्यंत कमी गणली गेलेली असल्याने त्यांची नोंद आदिवासी म्हणून या यादीत घेण्यात आलेली नाही किंवा तशी गरज ब्रिटिशांना त्या काळात वाटलेली नाही. परंतु याउलट धनगर समाजाची लोकसंख्या सदर यादीतील आदिवासी जमातींच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचे आपणास दिसून येते. असे असूनही ब्रिटिशांनी The Bombay Forest Rules, 1942 धनगर समाजाची आदिवासी जमातींच्या यादीत नोंद घेतलेली नाही. त्याचे कारण म्हणजे O H B Starte समितीच्या 1928-29 च्या अहवालानुसार धनगर समाजाचा समावेश Depressed Classes मध्ये करण्यात आलेला होता. याच Depressed Classes मधील अस्पृश्य नसलेल्या जातींचा समावेश पुढे Other Backward Classes madhye करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे O H B Starte समितीमध्ये स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. ही पार्श्वभूमी तपासली असता, घटना तयार होत असताना धनगर समाजाचा समावेश आदिवासी जमातींच्या यादीत होणे शक्यच नाही. असे असले तरी धनगर समाज Dhangad या शब्दाशी असलेले साधर्म्य गृहीत धरून आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे वादळ घोंघावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जरांगे पाटील यांनी सादर केलेले पुरावे हे सबळ असल्यानेच त्यांचे आंदोलन जनमाणसात रुजले गेले व त्यातून एक व्यापक चळवळ उभी राहिली. त्यांनी आपले आंदोलन चालवत असताना कोणत्याही काल्पनिक मांडणीचा आधार घेतला नाही ही बाब धनगर समाजाच्या नेत्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. जरांगे पाटील यांना आलेले यश हे त्यांनी केलेल्या संविधानिक मांडणीतून पुढे आलेले आहे. परंतु धनगर समाज मात्र या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून Dhangad म्हणजेच धनगर होय अशी काल्पनिक मांडणी करून रस्त्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
असो जसे मनोज जरांगे पाटील यांनी ठोस पुरावे सरकारच्या तोंडावर फेकून मारले, तसे ठोस आणि सबळ पुरावे मांडण्याची हिम्मत धनगर समाजाने दाखवावी एवढेच माझे म्हणणे आहे. बाकी मागणी करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे त्यानुसार त्यांनी मागणी करत राहायला हरकत नाही. फक्त या मागणीच्या आडून गोर गरिबांच्या पोरांचे बळी जाणार नाहीत याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
Oraon जमातीच्या विविध राज्यांतील अहवालानुसार/सर्व्हेनुसार Dhangad (धांगड), Dhangar (धांगर) ही विविध भागातील Oraon ची Ethnonym नावे आहेत याचाही जाणकारांनी बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे Dhangad आणि Dhangar याबाबत ठोस खुलासा करणे आपणास सहज शक्य होईल.
www.aboriginalvoice.blogspot.com
0 comments :
Post a Comment