संवत (संवत्सर) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. मराठी महिन्यांत गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.
जायबा मुकणे यांच्या शौर्यातून उभे राहिलेल्या जव्हार संस्थानात देखील त्यांचे स्वतःचे संवत होते, त्यास 'जव्हार संवत' असे म्हणत असत. जव्हार संस्थानचे महाराज नेमशहा यांना 'शहा' ही पदवी मिळाल्यापासून या नवीन शकाची सुरुवात करण्यात आली होती. ही गोष्ट शके 1265 ज्येष्ठ शु.12 रोजी झाली. या शकाचा आरंभ मृग नक्षत्रापासून केली जात होती. जव्हार संस्थान अस्तित्वात असेपर्यंत या शकाचा वापर केला जात होता. या शकामध्ये निसर्ग संस्कृती व पर्यावरणविषयक आदिवासी मूल्यांचा समावेश होता. जव्हार परिसरातील आदिवासी जीवनशैलीनुसार यामध्ये कालमापन केले जात होते. आज जगाला पर्यावरण संवर्धनाची गरज वाटत आहे. परंतु दुर्दैवाने गरज वाटत असताना देखील निव्वळ विकासाच्या नावाखाली पर्यावरण संपुष्टात आणले जात आहे. यामुळे एकूणच सजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे असताना जव्हार संस्थानच्या या वेगळ्या पैलूंचे महत्त्व अनन्यसाधारण होते हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जर जव्हार संस्थान आपली वेगळी ओळख व संस्कृती जपत होते, तर स्वातंत्र्यानंतर त्यात किती प्रयत्न झाले हा विचार आपण करणे आवश्यक आहे.
0 comments :
Post a Comment