श्रीमंतराजे यशवंतराव मुकणे यांना सन १९४१ ते १९४४ मध्ये इंग्रज सरकारकडून वैमानिक दलात सामील होण्याचा आदेश येताच, ते 'रॉयल एअर फोर्स' लाहोरमध्ये सामील झाले. त्यांनी साडेतीन वर्षांच्या कालावधीत 'अंबाला', 'कराची' व 'मुंबई' येथे वैमानिकाच्या प्रशिक्षणानिमित्त वास्तव्य केले. दुसऱ्या महायुद्धात श्रीमंत यशवंतराव मुकणे हे पायलट म्हणून होते. १९४३ साली कराचीहून 'मुंबई' येथे यायला निघाले, तेव्हा विमानाचे एक इंजिन निकामी झाले होते, फक्त एकाच इंजिनावर त्यांनी विमान 'मुंबई' विमानतळावर सुरक्षितपणे उतरविले. युद्धात पायलट म्हणून यशस्वी कामगिरी केल्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून त्यांना 'फ्लाईट लेफ्टनंट' हा बहुमानाचा किताब मिळाला. या ऐतिहासिक दिनाच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून 'विजयस्तंभ' यशवंतनगर मोर्चा येथे उभारला. जुन्या राजवाड्याच्या भव्य पटांगणात जनता दरबार भरवून त्यांना मानपत्र देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. जव्हारवासीयांनी त्यांची भव्य-दिव्य अशी अंबारीतून मिरवणूक काढली. प्रजेने त्यानिमित्ताने तारपानाच, ताशा, ढोलनृत्य व इतर पारंपरिक नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला.
जव्हार आज ज्या अडचणींचा सामना करत आहे, ते बघता जव्हारकरांनी आपल्याच इतिहासातून प्रेरणा घेऊन सामाजिक पातळीवर लढा उभारून आपल्या हक्कांसाठी पुढे आले पाहिजे.
© Raajoo Thokal
0 comments :
Post a Comment