जव्हार संस्थानचा इतिहास 632 वर्षांचा असला तरी त्यावर सखोल असे लेखन न झाल्याने त्याचा यथोचित इतिहास लोकांना माहीत झालेला नाही. याच इतिहासावर प्रकाश टाकणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज हे जुना राजवाडा आगीत जळून खाक झाला, त्यावेळी नष्ट झाले व काही कागदपत्रे येथील हवामानाच्या परिणामामुळे जीर्ण होऊन नष्ट झालेले आहेत.
असे असले तरी जव्हार संस्थानचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे, जव्हार संस्थानच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे भौगोलिक गडकिल्ले आपण जपले पाहिजेत या भावनेतून अलीकडे अनेक तरुण पुढे आलेले आहेत. याच प्रयत्नातून आता काही मौलिक गोष्टींवर सकारात्मक चर्चा होत आहे. या चर्चेतून नक्कीच चांगला इतिहास प्रकाशात येईल ही अपेक्षा आहे.
खालील जव्हार संस्थानशी निगडित असणारे काही स्टॅम्प पेपर त्याकाळातील संस्थानकालीन लोकाभिमुख न्याय व्यवस्थेवर प्रकाश टाकण्याचे काम करत आहेत. याबाबत अभ्यासू लोकांनी सविस्तर विवेचन करणे अपेक्षित आहे. सदर ऐतिहासिक दस्त ऐवज उजेडात येणे ही नक्कीच चांगली बाब असून आपणही आपल्याकडे जव्हार संस्थांनशी निगडित काही लिखित, मौखिक माहिती असेल किंवा फोटो, पुस्तके असतील तर त्यांची माहिती प्रकाशित करण्याची उदारता दाखवावी व हा भव्यदिव्य इतिहास समाजासाठी खुला करून जव्हारच्या वैभवशाली परंपरेचा वारसा जतन करावा ही विनंती.
आपला इतिहास....आपली जबाबदारी
राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment