अजूनही लढाई संपलेली नाही....
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर याचिका कर्त्यांकडून धांगड शब्द मुळात चुकीच्या पद्धतीने आला असल्याचे मत व्यक्त केले असून त्यात ओरांन धनगर अशी नोंद Censes Of India 1951 मध्ये असल्याचेही बोलले जात आहे.
असो ते त्यांची बाजू मांडत राहतील... पण येथे जो फोटो मी दिलेला आहे, तो Census of India 1951 च्या रिपोर्टचा एक भाग असून सदर अहवाल हा नागपूर येथून 1953 साली प्रकाशित करण्यात आलेला आहे. या अहवालात पुढील प्रमाणे भाषा बोलणाऱ्या लोकांची आकडेवारी दिलेली आहे. यात ओरांन - 243, धांगड - 8 व धनगर - 28 या स्पष्ट नोंदी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे या नोंदी एकाच ओळीत एकाच पानावर एकाच मुद्द्याला म्हणजे भाषेला अनुसरून केलेल्या आहेत. यात धांगड शब्द 1951 सालीच धनगर शब्दापेक्षा वेगळा असल्याची नोंद सरकार दरबारी आहे. त्यामुळे धनगर व धांगड हे एकच असल्याचा बचाव न टिकणारा आहे.
विशेष म्हणजे धांगड या अनुसूचित जमातीचा महत्त्वपूर्ण असा अहवाल एका राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला असून तो नेटवर उपलब्ध आहे. त्यानुसार धांगड आणि धनगर हे वेगळे आहेत असेही स्पष्ट केलेले आहे.
असो कागदी घोडे नाचवत असताना सत्य लपत नाही हे कोर्टाने सिद्ध केले आहे.
बाकी जितकी लढाई मोठी होईल, तितका विषयाला न्याय अधिक मिळेल हे मात्र नक्की.
डोळसपणे या निकालाकडे बघून आपली मागणी असंविधानिक आहे हे समजून घेतले तर धनगर समाजाचा पुढील प्रवास हा सामाजिक प्रश्नांवर काम करणारा ठरेल.
www.aboriginalvoice.blogspot.com
0 comments :
Post a Comment